प्रतिनिधी - दिवसेंदिवस जमिनीचे होणारे विभाजन वाढती तुकडेकरी त्यातुन शेतरस्त्यांचा निर्माण होत चाललेला गंभीर प्रश्न यासंदर्भात राहता तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासुन शेतकरी राहता तहसिल कार्यालयावर हेलपाटे मारत होते संबधित शेतरस्ते पिडीत शेतकऱ्यांनी राज्यात सुरु झालेल्या शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या तालुक्यांमध्ये शिव पाणंद शेतरस्ते खुले करण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी पुढाकार घेत शेतरस्त्याच्या शेवटच्या व्यक्तीला मोठा संघर्ष याठिकाणी करावा लागत आहे याचा गांभिर्याने विचार करत शेवटच्या भावाला दर्जेदार शेतस्ता मिळून देण्यासाठी व शेतकऱ्यांचा शेतरस्त्यांचा संघर्ष संपवण्याचा एकजुटीने निर्णय घेत राहता तहसिल कार्यालावर मोर्चा काढत घोषणाबाजी करत आंदोलन केले असता राहाता तहसिलदरांनी विषयाला गांभीर्याने घेत आचारसंहिता संपताच भूमिअभिलेख उपअधीक्षक योगेश थोरात यांसह राहाता शिवपाणंद शेतरस्ता शेतरस्ता समिती सदस्यांसमवेत समन्वय साधत विविध शिवरस्ता,शेतपाणंदरस्ता,बांधरस्ता यांसह तहसिलवर चालु शेतरस्ता केसेस आदी विविध विषयांवर सखोल चर्चा करत उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करणे कामी,अधिकृत कार्यवाही करणेबाबत नियोजन करत प्राधान्याने गावांना जोडणारे शिवरस्ते खुले करणे तसेच सर्व प्रशासकीय तालुका रस्तासमिती सदस्य व राहाता शिव पानंद शेतरस्ता समितीची प्रत्येक महिन्याला बैठक घेवून येणाऱ्या प्रत्येक शेतरस्त्याच्या अर्जदाराला शेतरस्ता देणाचे आश्वासन दिले यावेळी अविनाश बनकर,रावसाहेब गाढवे,अनिल आढाव,उमेश देवकर,यशवंत नळे,भाऊसाहेब निर्मळ,शामराव झणान,बाळासाहेब वराडे,दिलीपराव आग्रे,भाऊसाहेब मुजमुले,
बद्रीनाथ सदाफळ आंदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राहता तालुक्यातीत शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील ,प्रशासकीय अधिकारी यांसह वृत्तपत्रांसह प्रसारमाध्यमांचे विशेष आभार मानले.
शिवपाणंद शेत रस्ते टप्याटप्याने खुले करण्याचे राहता तहसिलदारांचे आश्वासन
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0
