नेवासा खुर्द खूपटी शिव रस्ता खुला झाला ; महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद रस्ता चळवळीचे यश

 प्रतिनिधी / श्री नाथाभाऊ शिंदे पाटील

 नेवासा तालुक्यातील नेवासा खुर्द खूपटी शिवरस्ता गेल्या पन्नास वर्षांपासून बंद होता तो शिवरस्ता शासकीय मोजणी करून भूमि अभिलेखचे उपाध्यक्ष श्री व संदीप गोसावी साहेब भूकर मापक श्री विजय रायकर यांनी मोजणी करून शिवरस्ता  हद्दी खुणा दर्शविल्या लगेचच तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांनी शिवरस्ता खुला करण्यासाठी संबंधितांना आदेश दिले तसेच प्रत्यक्ष पोलीस संरक्षणात  व प्रत्यक्ष उभे राहून जेसीबीने शिवरस्ता खुला केला शिव रस्ता खुला करण्याची मोहीम गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र राज्य शेत व शिवपालन रस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरद पवळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून नेवासा तालुक्यामध्ये दहा ते बारा शिव रस्ते खुले करण्यात आलेले आहेत या प्रकारे शिव रस्ते खुले करण्यामुळे तालुक्यामध्ये आणखी काही शिवरस्ते खुले होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने