प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील काटाळवेढा येथे दि.२७ डिसेंबर रोजी मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी , मोफत चस्मे वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर मा.खासदार लोकनेते डॉ.नीलेशजी लंके यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
मा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार लोकनेते मा.डॉ.नीलेश लंके यांच्या वतीने पारनेर येथे १२ डिसेंबर रोजी फिरता दवाखाना गाडी चे उद्घाटन शुभारंभ पार पडला होता.
काटाळवेढा डोंगरवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभाग दाखवला यावेळी काटाळवेढा गावचे आदर्श सरपंच पियूष दादा गाजरे , ग्रा.सदस्य अजितशेठ भाईक, पोपट गुंड, गेनभाऊ भाईक, सा.कार्य.दत्ता भाईक , सा.कार्य.विलास शेठ भाईक, ह.भ. प.बाळासाहेब भाईक ,तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गुंड,सुभाष गाजरे सर,लक्ष्मण भाईक, बारकु अप्पा पवार,संभाजी भाईक, दिलीप गुंड, यशवंत वाघ, संपत भाईक,नाना डोंगरे, शिवाजी डोंगरे , पत्रकार गणेश वाघ आणि परिसरातील बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
काटाळवेढे येथे नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0
