वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी - काल दि.३१ डिसेंबर रोजी काटाळवेढा येथील श्री. यशवंत कृष्णाजी भाईक ( मा सरपंच) यांनी नातवंडाच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
यशवंत कृष्णाजी भाईक माजी सरपंच हे नेहमी गावच्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. गावचे सरपंच पद भूषवत असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचे मोठे चिरंजीव अजित यशवंत भाईक यांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा ,अंगणवाडी काटाळवेढे येथील विद्यार्थ्यांना दैनदिन वापरात लागणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक श्री. प्रकाश आंधळे सर आदर्श शिक्षिका छाया घोडे मॅडम यांचे सहकार्य लाभले .
नातवंडांचा वाढदिवस राबविणारे श्री.यशवंतराव भाईक गावचे सरपंच असताना अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी सुरू केले होते .यांचे गावातील सर्वात मोठे कुटुंब असुन मुलगा अजित, योगेश तसेच पुतणे विलास ,दत्ता हे सध्या गावातील सर्व सामाजिक, सार्वजनिक कार्याच्या नियोजनात प्रमुख भूमिका बजावतात . या वाढदिवसानिमित्ताने नगर दक्षिण चे खासदार निलेश लंके साहेब यांचे ज्येष्ठ बंधू दीपक अण्णा लंके शिरापुर गावचे सरपंच भास्करशेठ उचाळे, सरपंच पीयूष गाजरे, साकुरी गावचे माजी सरपंच शोभा विश्वासराव , ग्रा. सदस्य अजितशेठ भाईक , कृ. उ.बाजार समितीचे माजी संचालक खंडूशेठ भाईक, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गुंड, नीलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष पोपटशेठ गुंड,आदर्श शिक्षक बाजीराव भाईक सर, गुंड आर. वाय.सर,युवराज भाईक सर, शिवाजी शेठ डोंगरे,उद्योजक राहुल गुंड , ह भ प बाळासाहेब भाईक ह्या मान्यवरांनी निवासस्थानी उपस्थित राहून या दोन्ही बाळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळेस गावातील ग्रामस्थ मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने