प्रतिनिधी - आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती येथे बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाला भेट दिली. यावेळी दूध संघाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दुध दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून निर्णय घ्यावेत अशी मागणी केली.
दुध संघाचे सभासद शेतकरी आणि दरासंबधीच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी संचालकांसोबत समन्वय साधून पुढील पंधरा दिवसात बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी पत्राद्वारे दूध संघाचे चेअरमन यांना केली आहे. याप्रसंगी युगेंद्र पवार, एस एन बापू जगताप, राजेंद्रबापू जगताप, वनिता बनकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
