"एक भाकर तीन चुली" या देवा झिंजाड लिखित कांदबरीला मृत्युंजय राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

संघर्ष मराठी २४ न्युज साठी गणेश वाघ


प्रतिनिधी - महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा मृत्युंजय राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२४ हा यंदा "एक भाकर तीन चुली" ह्या कादंबरीला दिला जाणार आहे. 


सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ आणि अशोक नायगावकर तसेच तसेच लेखक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते देवा झिंजाड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम शाल श्रीफळ सन्मानचिन्ह असा आहे. 


ग्रामीण भागातील स्त्रीचा संघर्षपूर्ण आलेख मांडत असताना अजूनही स्त्रियांची होणारी घुसमट हा या कादंबरीचा मुख्य गाभा असून ह्या कादंबरीला आजवर अत्यंत महत्त्वाचे असे राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी त्यांच्या मुलाखती सुद्धा झालेल्या असून अतिशय चांगल्या प्रकारे ह्या कादंबरीला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. तसेच मराठीतील सामाजिक कादंबरी विभागांमध्ये सगळ्यात बेस्ट सेलर कादंबरी म्हणून ही कादंबरी सगळीकडे गाजत आहे. वर्षभराच्या आतच आत्ता नववी आवृत्ती प्रकाशित झालेले असून वाचकांची अजूनही मागणी सुरूच आहे. 


कवी लेखक देवा झिंजाड हे पारनेर तालुक्यातील गारखिंडी हा अतिशय छोट्याशा दुर्गम खेड्यातील आहेत. त्यांनी जिद्द चिकाटी आणि संघर्षाच्या जोरावर आपले शिक्षण घेऊन लेखन सुद्धा चालू ठेवलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने