अखेर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरील पेरू वाटप आंदोलनाला मोठे यश


संघर्ष मराठी २४ न्युज साठी गणेश वाघ

प्रतिनिधी - पुणे जिल्ह्यातील शेतरस्ताविषयक अडचणींचा होणार निपटारा  करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या् गावातील गाडी रस्ते, पाणंद, शिवरस्तेे, शेतरस्ते, शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग हे अतिक्रमण किंवा इतर कारणामुळे  बंद झालेले असल्यास सदर रस्त्यावरील अतिक्रमण,अडथळा दूर करण्या्साठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांकडे रितसर अर्ज करावेत,समृध्द  व शाश्ववत शेती विकासासाठी शेती व्यनवस्थापन जलदगतीने होणे आवश्य्क आहे. अनेक ठिकाणी जून्या  काळातील गाडी रस्ते / पाणंद/ शिवरस्तेथ/शेतरस्ते/शिवार रस्ते/शेतावर जाण्याचे पायमार्ग वहीवाटीचे अभावी अतिक्रमीत झालेले आहेत, अरुंद झालेले आहेत. त्यातमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे,  देखरेख करणे  याकामी अडचण निर्माण होत असते. क्वचित ठिकाणी रस्ते, वहिवाटीच्या कारणामुळे वादविवाद निर्माण होवून न्या‍यालयीन प्रकरणे उद्भवतात. संबंधित शेतकऱ्यांचे वेळेबरोबरच आर्थिक नुकसान व मानसिक त्रास संभवतो अशा  शेतकऱ्यांनी वरीलप्रमाणे शेत रस्ताविषयक अडचणींचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी शेताकडे जाणारे गाडी रस्ते / पाणंद/ शिवरस्ते /शेतरस्ते‍/शिवार रस्ते/शेतावर जाण्याचे पायमार्ग अतिक्रमण / अडथळा मुक्त करण्यासाठी पणे जिल्हा प्रशासणाने पेरु वाटप आंदोलनाची दखल घेवून शेतकऱ्यांना न्याय दिला याबद्दल उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख- मोहिते यांनी तातडीने संबंधित सर्व विभागांना संपर्क साधत नियोजनबद्ध रूपरेषा आखत तालुका प्रशासनाला कालबद्ध महाराजस्व अभियान राबवण्याचे  आश्वासन सार्थ ठरवले असून तालुका प्रशासणाकडून पारदर्शक अभियान राबवून घेण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची असे मत महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानताना व्यक्त केले यावेळी सुरेश वाळके,सचिन शेळके, शांताराम पानमंद,राहुल शिंदे,बबन दाभाडे ,योगेश भोस ,सचिन वाळुंज ,सविता वाळुंज, सुमन भंडारी, गोपीनाथ नरवडे,लक्ष्मण धुमाळ, शिवाजी शिवले, नानासाहेब काळे, दत्तात्रय बांगर, सुनिल शेळके, पंकज गायकवाड, प्रताम देशमुख, अरुण नरवडे, नानासाहेब काळे, भास्कर हिंगे, श्रीहरी पाटोळे, निलेश लवांडे,संकेत लवांडे, प्रकाश वाखारे,विक्रम भोगावडे, हनुमंत पडवळ,युवराज कळसकर,शांताराम चव्हण, काळूराम पवार,आनंदा टेमगिरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसार माध्यमांसह प्रशासणाचे विशेष आभार मानले.

महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेत्वृत्वात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेरू वाटप आंदोलन जिल्हातील शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करा, नंबरी हलवणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा, महसुल/ तहसिलवर प्रलंबित रस्ता केसेस निकाली काढा, वहिवाटीच्या शेतरस्त्यांना नकाशावर घ्या आदी शासन निर्णयासह हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करा संदर्भातील आंदोलन उपजिल्हाधिकारी डॉ.चारुशिला मोहिते/देशमुख यांनी दिलेले आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या जाहीर परिपत्रकातुन पुर्ण झाले असुन पुढची जबाबदारी तालुका प्रशासनाची.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने