दलित महासंघाची जिल्हा कार्यकारणी बैठक सोमवारी अहिल्यानगर येथे होणार

संघर्ष मराठी न्युज साठी गणेश वाघ
प्रतिनिधी - दलित महासंघाची अत्यंत महत्त्वाची अशी बैठक सोमवार, दिनांक २४/ ०२/ २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह, अहिल्यानगर येथे सकाळी ठीक ११:०० वाजता संपन्न होणार आहे. दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ सुलाखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले आहेत. जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील पदाधिकारी नियुक्ती करण्यात येणार आहेत सदर बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष मा.संजय चांदणे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी मोठया संख्येने बैठकीसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.कडुबाबा लोंढे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने