प्रतिनिधी - किल्ले धर्मवीरगड राज्य संरक्षित स्मारक झाल्यानंतर दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने भविष्यात याचा मोठा फायदा या गडाच्या व गावच्या विकासासाठी व निधी मिळण्यासाठी होणार आहे,आपल्या श्रीगोंदा तालुक्याचे कार्यक्षम आमदार माननीय श्री विक्रम दादा पाचपुते यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे,भारतीय पुरातत्व विभाग संभाजीनगर येथील श्री. शिवकुमार भगत साहेब, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नाशिक येथील श्री. अमोल गोटे साहेब, तहसीलदार वाघमारे मॅडम, उपधीक्षक भूमि अभिलेख श्रीगोंदा जाधव साहेब वरील सर्व शासकीय विभागाच्या सहकार्याने, तसेच ग्रामपंचायत पेडगाव,सर्व शिव शंभू भक्त भारतीय पुरातत्त्व विभाग संभाजीनगर चा एरिया(लक्ष्मीनारायण मंदिर व बालेश्वर मंदिर) वगळून उर्वरित गड राज्य संरक्षित स्मारक होणे कामी, गडाची पुनश्च एकदा रीतसर मोजणी आज करण्यात आली या कामी भूमी अभिलेख श्रीगोंद्याचे पाटील साहेब,डॉ.निलेश खेडकर,दादासाहेब जंगले पाटील,
संदेश अनभुले, संतोष फराटे, दत्ताजी जगताप, शिवाजी राजे साळुंखे,राजेश बाराते, शंकर अप्पा जाधव,भारतीताई इंगवले,विशाल गायकवाड,गडपाल भाऊ घोडके नंदकिशोर क्षीरसागर,मच्छिंद्र पंडित, उपस्थित होते,किल्ले धर्मवीर गडच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नुकतीच विधानसभा अधिवेशनात आमदार विक्रम दादा पाचपुते यांनी केली आहे, महायुती सरकार यासाठी लवकरच सकारात्मक पावले उचलेल ही अपेक्षा, गडाचा सातबारा,टोच नकाशा चतुर् सिमेसह,उपलब्ध करून लवकरच पुढील कार्यवाहीसाठी शासकीय कागदपत्रे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नाशिक यांच्याकडे पोहोच करण्यात आली, तसेच यावेळी पर्यटन विभागाचे पवार साहेब यांच्यासोबत देखील गावातील पर्यटन दृष्ट्या सकारात्मक चर्चा करण्यात आली,यामुळे किल्ल्यात व परिसरात असणारे पुरातन अवशेष, छत्रपती संभाजी महाराज स्मारक,मंदिरे,राजदरबार,वेशी,हत्ती मोट, तटबंदी,बुरुंज असे अनेक अवशेष यांचे अचूक मोजमाप व नोंद होणार आहे,दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने भविष्यात याचा खुप मोठा फायदा किल्याच्या व गावच्या विकासासाठी होणार आहेअशी माहिती गडदुर्ग संवर्धक डॉ.निलेश खेडकर यांनी दिली, या शिवकार्यामुळे शिवप्रेमी मध्ये आनंदाचे व नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत.
