![]() |
प्रतिनिधी - नाथाभाऊ शिंदे
प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था म्हणजेच बेल्हेकर इन्स्टिट्यूट मध्ये आज दिनांक ८मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. राष्ट्रमाता जिजाऊ माता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला संस्थेचे उपाध्यक्ष व संचालिका डॉक्टर सौ रंजनाताई बेल्हेकर व नीलिमा निचीत ताई व श्री संजय कुमार निचित व स्वाती वाघे मॅडम यांनी पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून महिला दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी जागतिक महिला दिन साजरा करणे मागचे हेतू व उद्देश याबाबत शैक्षणिक प्रकल्पातील मुलांचे मुलींचे जोरदार भाषणे व नृत्य व कथा गायन कार्यक्रम संपन्न झाला. डॉक्टर सौ रंजनाताई बेल्हेकर यांना माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते सत्कार ही झालेला आहे याबद्दलची आठवण काढण्यात आली. व तसेच त्यांचा सत्कार स्वाती वाघे मॅडम यांनी केला माननीय नीलिमा निचीत मॅडम, यांचाही डॉक्टर सौ रंजनाताई बेल्हेकर मॅडम यांनी सत्कार केला एक कर्तुत्वान स्त्री असा त्यांचा उल्लेख करण्यात आला नारी शक्तीचा सन्मान आज करण्यात आला.
यावेळी कृषी महाविद्यालयातील शिक्षिका आरती वाघ मॅडम, प्रोफेसर गोरटे मॅडम, मुळे मॅडम बी एम एस कॉलेजच्या डॉक्टर तन्वी उगले, डॉक्टर स्नेहा ओहोळ, फार्मसी महाविद्यालयातील प्रोफेसर कर्जुले मॅडम, पुनम साळुंके मॅडम, स्वरा जावळे मॅडम, बीएड कॉलेजमधील शिक्षिका मनीषा भोईटे मॅडम उपस्थित होते.
