प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे पाटील
कांदा निर्यातीवरचे २०% निर्यात शुल्क १ एप्रिल २०२५ पासून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ग्राहक व्यवहार विभागासोबतच्या सल्लामसलतीनंतर महसूल विभागाने आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली.
कांदा निर्यातीवरचे २०% निर्यात शुल्क हटविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री भारत दिघोळे यांच्या प्रयत्नाला व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने व शेतकऱ्यांच्या जीवनाच्या प्रश्नाला न्याय मिळाला त्यामुळे सर्व कांदा उत्पादक शेतकरी आनंदात आहेत असे मत नेवासा बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी व अभ्यासक श्री सागर सोनटक्के,बेलपिंपळगाव येथील श्री संजय गटकळ दिगंबर धिरडे व चेअरमन शिंदे यांनी व्यक्त केले.
