रेशन दुकानाबद्दल तक्रारी आल्यास गय केली जाणार नाही; ना. अजित दादा पवार उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री

प्रतिनिधी / राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करुन ते १५० रुपयांवरुन १७० रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरीपुरवठा मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

केंद्राची मान्यता असलेल्या आणि नाफेडमार्फत उपलब्ध होणाऱ्या दहा जीवनावश्यक वस्तूंची विक्री शिधावाटप दुकानातून करण्यास तसेच मुंबई आणि ठाणे क्षेत्रातील शिधावाटप कार्यालयांची पुनर्रचना करुन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय अशी पुनर्रचना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच यापुढे गाव खेड्यातील रेशन शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करताना  रेशन दुकानदाराच्या बाबतीत काही तक्रारी आल्यास तातडीने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे त्यात कोणतीही गय केली जाणार नाही असे हे नामदार अजित पवार यांनी निर्देश दिले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने