सुजित झावरे यांचा विकास कामांसाठी नेहमीच पाठपुरावा : मा. खा. सुजय विखे


पारनेर/प्रतिनिधी : 

पारनेर तालुक्यात सत्ता नसतानाही सुजित झावरे यांनी सर्वदूर विकासकामे मार्गी लावली आहेत. विकास कामांसाठी त्यांचा नेहमीच पाठपुरावा असतो. असे माजी खासदार सुजय विखे म्हणाले

पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे श्री बिरोबा यात्रा उत्सवानिमित्त सुजित झावरे पाटील आणि देवकृपा फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. या शर्यतीचे उद्घाटन माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी नव्याने बांधण्यात आलेल्या बैलगाडा घाटाचे ही लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. संगमनेर, जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि नगर या भागांतील स्पर्धकांनी या शर्यतीत उत्साहाने सहभाग घेतला.यावेळी बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सुजित झावरे पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले, वासुंदे येथील बिरोबा मंदिरासाठी सभामंडप आणि गावातील इतर विकासकामांसाठी सुजित झावरे यांच्या नेतृत्वात निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. “मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासकामांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.या कार्यक्रमाला अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, गुरुदत्त पतसंस्थेचे चेअरमन बा. ठ. झावरे, युवक तालुकाध्यक्ष भास्करराव उचाळे, माजी सभापती अरुणराव ठाणगे, माजी पंचायत समिती सदस्य अमोल साळवे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी रोकडे, राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्षा सुधामती कवाद, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सुषमा रावडे, ऍड. बाबासाहेब खिलारी, उपसरपंच शंकर बर्वे, शंकर महांडुळे, सतीश पिंपरकर, रवींद्र पडळकर, स्वप्निल राहींज, विठ्ठल कवाद, दिलीप पाटोळे, बाळासाहेब झावरे, गजानन झावरे, बाळशीराम पायमोडे, स्वप्निल झावरे, इंजि. प्रसाद झावरे, सचिन सैद, इंजि. निकिल दाते, तुकाराम झावरे, दत्तात्रय काळणर, बाळासाहेब साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.या बैलगाडा शर्यतीने गावातील उत्साह द्विगुणित केला. सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखालील विकासकामे आणि सांस्कृतिक उपक्रमांनी वासुंदे गावाला नवी दिशा मिळाली आहे. येत्या काळातही अशा उपक्रमांमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने