काटाळवेढा, पळसपूर परिसरात बिबट्याचा वाढता धोका;ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन


प्रतिनिधी - पळसपूर, ढगेवाडी, काटाळवेढा व डोंगरवाडी या परिसरामध्ये मागील आठवड्यापासून बिबट्याच्या हालचालींमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज बिबट्या दिसल्याच्या अनेक घटना समोर येत असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, मुले यांचा जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

काटाळवेढा परिसरात गेल्या काही दिवसात  शेतकऱ्यांच्या शेळ्या, व वासरे खाल्ल्याच्या अनेक  घटना घडल्या असून,या पार्श्वभूमीवर काटाळवेढा, पळसपूर ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासन आणि वनविभागाचे लक्ष वेधून घेत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला करण्यात आलेल्या विनंतीत म्हटले आहे की,

“आमच्या भागामध्ये बिबट्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सतत दहशतीचे वातावरण आहे. वनविभागाने या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. ही लोकांच्या सुरक्षिततेची अत्यंत गंभीर बाब आहे.”

ग्रामस्थांनी  आमदार आणि खासदार महोदयांनाही निवेदन देऊन याकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे.

पळसपूर, पळसपूर ढगेवाडी, काटाळवेढा व डोंगरवाडी परिसरातील जनतेने म्हटले आहे की,

“आमच्या क्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढल्याने शेतात जाणे, सकाळ-संध्याकाळ बाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शक्य तितक्या लवकर पिंजरा उभारून बिबट्याचा बंदोबस्त करावा.”

पळसपुर, ढगेवाडी , कातळवेढा, डोंगरवाडी  ग्रामस्थांकडून प्रशासन व वनविभागाला तातडीने योग्य ती पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने