अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी


 पारनेर तालुक्यातील पठार भागावरील कातळवेढे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली.

या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते, रक्तदान शिबीर, मोफत सर्व रोग निदान व उपचार आरोग्य शिबीर व मोफत नेत्र तपासणी समर्थ आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने आयोजित करण्यात आल होत, मोठया संख्येने परिसरातील रुग्णांनी सहभाग नोंदवला. यामध्ये गरजू रुग्णांना मोठया प्रमाणात फायदा झाला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. प्रभाकर गावडे सर यांच्या शुभहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक या इलेक्ट्रिक बोर्डाचे फित कापून अनावरण करण्यात आले.

 डॉ. लक्ष्मनराव नजान सर यांच व्याख्यान आयोजित करण्यात आल होत. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा संपूर्ण इतिहास सांगितला.

सुदाम पवार यांनी मनोगत व्यक्त करताना आजपर्यंत मी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होताना पाहिली नव्हती आज पाहिली. शंभर तरुण एकत्र येऊन ही जयंती साजरी होत आहे. आपण जयंती का साजरी करावी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे साठी या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

अहिल्यादेवी होळकर यांनी पहिले जे काम केले ते म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाचे काम हाती घेतले . पशु पक्षी यांच्यासाठी पाण्याची सोय केली. प्रत्येकान या जयंती निमित्ताने एक झाड लावावे असे आव्हाहन मनोगत व्यक्त करताना तंटामुक्ती अध्यक्ष गावडे सर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या वेळी गावातील सर्व समाज बांधव , तरुण ,अबालवृद्ध, महिला,सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती व समस्त ग्रामस्थ कातळवेढे यांच्या वतीने या भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने