पारनेर तालुक्यातील काटाळवेढे गावचे प्रा. संतोष बारकु पवार यांना नुकतीच सनराईज युनिव्हर्सिटी , राजस्थानची मॅनेजमेंट विभागातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. मॅनेजमेंटमध्ये पीएचडी पदवी मिळवणारे ते काटाळवेढे गावातील पहिलेच विदयार्थी आहेत. त्यांचा मॅनेजमेंटमध्ये संस्थांमधील औदयोगिक संबंधामध्ये मानवी संसाधन विकास सराव पध्दतीवरील कार्यप्रदर्षन मुल्यमापन परिणामांचा प्रायोगिक अभ्यास हा शोधनिबंध होता. प्रा. डाॅ. दयानंद सुरवाडे आढळराव पाटील इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट, लांडेवाडी, पुणे पीएचडी गाईड यांचे मार्गदर्शन लाभले तसेच डाॅ. संतोष पवार हे समर्थ कॅपस, बेल्हे येथे कार्यरत आहेत. त्यांच्या यशाबद्दल गावचे सरपंच श्री. पियुष गाजरे , सामाजीक कार्यकर्ते श्री. दत्ता भाईक तसेच काटाळवेढे व टाकळी ढोकेश्वर परीसरातील मित्रपरीवाराने त्यांचे कौतुक केले व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कातळवेढे येथील डॉ.संतोष पवार यांना "पीएचडी" पदवी प्रदान
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0
