साकुर येथे गोळीबार करत सोन्याचे दुकान लुटले

संगमनेर:तालुक्यातील साकूर येथे पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोन्याचे दुकान लुटल्याची घटना सोमवारी (ता. ११) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेतली असून पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.साकुर बसस्थानकाजवळ निखील सुभाष लोळगे यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. भरदिवसा पाच दरोडेखोरांनी येऊन या दुकानासमोर हवेत गोळीबार केला. तसेच थेट दुकानात घुसून बंदूकीचा धाक दाखवत संपूर्ण सोन्याची दागिने लुटून नेले. पाचही दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधलेले होते. दुकानाच्या बाहेर पडत असताना दरोडेखोरांनी भर रस्त्यात रिव्हॉल्व्हर काढून फायरिंग केली. त्यानंतर पुन्हा खडकी रस्त्यावर फायरिंग करून दरोडेखोर पारनेरच्या दिशेने पसार झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने