लोणी मधील सभेत लाईट बंद करण्याच्या प्रचारासह गावोगावी समाजकंटकांनी फ्लेक्स फाडले
(प्रतिनिधी)--पस्तीस वर्षे सत्ता असूनही कोणतेही विकास कामे न करता जनतेला भुलथापा देणाऱ्यांना यावेळेस जनता माफ करणार नाही. मी साधी गृहिणी असून मला मिळणारा मोठा पाठिंबा पाहून सत्ताधारी घाबरले आहे .भर सभेतील लाईट बंद करणे फ्लेक्स फाडणे अशी वाईट कृत्ये ते करत आहेत. मात्र आपली लढाई सुरूच राहील असे सौ प्रभावती ताई घोगरे यांनी म्हटले आहे.
लोणी बुद्रुक येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या. यावेळी ताराचंद म्हस्के, सुधीर म्हस्के, पंकज लोंढे, उत्तमराव घोरपडे, नानासाहेब शेळके, गोकुळ डूबे आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना सौ.प्रभावती घोगरे म्हणाल्या की, 35 वर्षाची दहशत मोडून काढण्यासाठी मी उभी आहे. जनतेचा वाढता पाठिंबा पाहून सत्ताधारी घाबरले आहे. माझ्या सभांमध्ये अडचणी निर्माण करणे, भर सभेमध्ये लाईट बंद करणे ,गावोगावी माझ्या प्रचाराचे लागलेले फ्लेक्स फाडणे असे दुष्कृत ते करत आहे. यामधून त्यांची मानसिकता दिसत आहे. लाडक्या बहिणीचा डांगोरा राज्यभर पिटणाऱ्या भाजपने महिलांची अवस्था काय आहे ते शिर्डी मतदारसंघात येऊन पहा असे आवाहन करताना हा लढा सर्वसामान्यांसाठी आहे.
जनतेचा पाठिंबा मिळत आहे लोक दडपशाही खाली आहेत. मात्र मतदान रूपाने ते यांची दहशत मोडून काढणार आहेत. येथे लोकशाही नसून ठोकशाही आहे. बोलू दिले जात नाही. जो विरोधी बोलतो त्याचे हातपाय मोडले जात आहेत. सभा घेण्याची स्वातंत्र्य आहे. मात्र आमच्या सभा घेण्यासाठी सुद्धा अडथळे निर्माण करत आहेत. माध्यमांची मुस्कटदाबी केली आहे. पत्रकार याला वाचता फोडत नाही हे दुर्दैव आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे यांनी लोकांना जेवढा त्रास दिला तेवढा लोक यांना त्रास देतील. असे सांगताना कोणीही दहशतीला घाबरू नका सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कम उभे रहा असे आवाहन केले
तर ताराचंद म्हस्के म्हणाले की, शिर्डी मतदारसंघांमध्ये लोकशाही राहिली नाही. एक साधी महिला भाजपच्या नेत्याविरुद्ध लढत आहे. त्यांना मतदारसंघातून बाहेर सुद्धा पडता येत नाही अशी अवस्था निर्माण झाली आहे. यावेळेस परिवर्तन अटळ आहे.
तर सुधीर म्हस्के म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्ह्यात निवडणूक लढवली जात असून सर्व राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे सौ. प्रभावती घोगरे या लढवय्या असून आता कुणीही न घाबरता सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे रहा असे आव्हान केले
यावेळी दिवसभरात त्यांनी आडगाव ,गोगलगाव ,चंद्रपूर, लोहगाव ,लोणी खुर्द या ठिकाणी विविध नागरिकांशी संवाद साधला
*आडगाव येथे समाजकंटकांनी फ्लेक्स फाडले तर लोणीतील सभेत लाईट गायब*
सौ.प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लावण्यात आलेले फ्लेक्स समाजकंटकांनी फाडले तर लोणी बुद्रुक येथे सभा सुरू असताना लाईट बंद करण्यात आली तरीही मोठी गर्दी थांबून राहिल्याने सभा सुरूच होती यामुळे दडपशाही किती आहे हे जनतेने समजून घ्यावे असे आव्हान सौ प्रभावती ताई घोगरे यांनी केले आहे
घोगरे यांना मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्याने सत्ताधारी धास्तावले
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0
