प्रतिनिधी -संगमनेर तालुक्यातील साकूर येथे काल दुपारी पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोन्याच दूकानच लूटून नेल्याची घटना घडली होती. विशेषतः भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. तसेच दूकानाबाहेर येऊन या दरोडेखोरांनी हवेत फायरिंग करत तेथूनच पसार झाले होते. या दरोडेखोरांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेसह पोलिसांच पथक रवाना झाले होते. दरम्यान पाच दरोडेखोरांपैकी दोन दरोडेखोराला पारनेर तालुक्यातील कुरणवाडी – जांभुळवाडी परिसरातून जेरबंद करण्यास पोलिसांना यश आल्याची माहिती समोर आलीय. यापैकी एक दरोडेखोर बारामतीचा असल्याची माहिती समोर आलीय. तसेच मोटारसायकल ही ताब्यात घेतल्या आहेत. उर्वरित ३ दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. दरम्यान सदर दरोडेखोर डोंगरात लपून बसलेली माहिती पोलिसांना मिळाली होती.
मात्र घटनास्थळापासुन 25 किलोमीटर अंतरावरच वासुंदे ता.पारनेर शिवारात काल दुपारपासुनच पोलीसांनी आरोपींची नाकाबंदी केली होती.
साकूर बसस्थानकजवळ निखील सुभाष लोळगे यांच कान्हा ज्वेलर्स चे दूकान आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास दूकानातील कामगार जेवण करायला गेले होते. दूकानात एक जण कामगार होता. याच वेळी दोन पल्सर गाडीवर पाच दरोडेखर दुकानासमोर आले. या दरोडेखोरांनी थेट कान्हा ज्वेलर्सच्या दूकानात घुसून कामगाराला बंदूकीचा धाक दाखवत संपूर्ण सोन्याचा मालच लूटून नेला.दरोडेखोरांनी गंठण, चैनी, मंगळसूत्र, वाट्या, कान चैनी, मिनी गंठण, टॉप्स, बाळ्या आदि सोन्याचं माल घेऊन पारनेरच्या दिशेने फरार झाले आहे. यावेळी दरोडेखोरांनी पळून जाताना फायरिंग केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान ही घटना कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अक्षरशः एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दूकानाची पाहणी करत काही पोलिस कर्मचारी थेट दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी मार्गस्थ झाले आहे. घटनेची माहिती मिळताच नगरचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच ठसे तज्ज्ञ, श्नान पथकाने घटनास्थळी दाखल झाले होते.
साकुर येथील दरोड्यातील एका दरोडेखोरास पोलिसांना पकडण्यात यश
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0
