शिवजन्मभूमीत विजय तुतारीचाच!
प्रतिनिधी - जुन्नर तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या उपस्थितीमध्ये आज संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळेंच्या उपस्थितीमध्ये श्रीराम मंगल कार्यलय, राजुरी येथे विजय सभा पार पडली. संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे व शिवसेना उपनेते बबनभाऊ थोरात यांनी उपस्थित सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष तसेच तालुक्यातील जेष्ठ नेते मंडळींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्राचं खाऊन आपल्या स्वाभिमानी जनतेच्या हक्काचं गुजरातला पाठवणाऱ्या सरकारला पहिले सत्तेतून बाहेर काढा, असा संदेश आदरणीय सुप्रियाताईंनी स्वाभिमानी जनतेला दिला. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महागाई आटोक्यात आणून ५ वर्ष स्थिर भाव, महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत ३ हजार रुपये महिन्याला तसेच महाराष्ट्रातील होणाऱ्या गुंतवणुकीच्या माध्यमातून पहिला हक्क स्थानिकांना देण्याचा, शब्द सुप्रियाताईंनी जनतेला दिला.
जुन्नर तालुक्यातील बिबट समस्या, पाण्याचे नियोजन, शेतकऱ्यांना थ्री फेज लाईट आणि इतर अनेक प्रश्न सोडवण्याबद्दल मी मायबाप जनतेला आश्वस्त केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दारांना थारा न देता, निष्ठावंत मावळ्याला निवडून आणणारच असा निर्धार उपस्थित जनतेने केला.
यावेळी शिवसेना उपनेते बबनराव थोरात साहेब, मंजिरीताई घाडगे, प्रकाशशेठ लामखेडे, अशोकराव आल्हाट, अनिलतात्या मेहेर, किशोरशेठ दांगट, ज्येष्ठ नेते शरदराव लेंडे साहेब, गुलाबनबी शेख, अनंतराव चौघुले, गुलाबशेठ पारखे, मोहितदादा ढमाले, अंकुशशेठ आमले, माऊलीशेठ खंडागळे, तुषारशेठ थोरात, अशोकशेठ घोलप, बाबुभाऊ पाटे, ऋषिभाऊ डुंबरे, अनिलतात्या मेहेर, शरदआण्णा चौधरी, मंगेश अण्णा काकडे, किशोरशेठ दांगट, रईस चौगुले, सुनिलशेठ मेहेर, संजयशेठ गुंजाळ, भास्कर पाडेकर, जयवंतराव घोडके, मोहनशेठ बांगर, अनिलशेठ तांबे, संभाजीशेठ तांबे, शैलेश म्हस्के, विकी गोसावी, गुलाब नबी शेख, शिवाजीराव खैरे, सौरभ डोके, विशाल तांबे, बाजीराव ढोले, दीपक औटी, वल्लभ शेळके सर, शोभाताई शिंदे, नंदूकाका शेरकर, समीर शेरकर, अर्चनाताई भुजबळ, पुष्पाताई कोरडे, सुरेखा ताई वेठेकर, शोकाताई शिंदे, ज्योत्सनाबाई महाबरे, सुजातालाई डोंगरे, आदिनाथशेठ चव्हाण, संदीप ताजणे, सईदभाई पटेल, रौफ खान, समीर भगत, सुनिल ढोबळे, बाजीरावशेठ मानकर, चैत्राली केंगले, चंदाताई गाडगे, सोनल शेटे, नागेवरी केदार, शांताताई कुटे, अंकिताताई गोसावी, शिवाजीराव वरखडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक यांच्यासह इतर मान्यवर, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवजन्मभुमित विजय तुतारीचाच
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0
