आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष व संघटनांचा काशिनाथ दाते सर यांना पाठिंबा

-
प्रतिनिधी - पारनेर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकमधे तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष व संघटनांची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.सदर बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ महादु दाते सर यांना सर्वानुमते जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. राजकारणात घराणेशाही निर्माण झाली की तिचे रुपांतर हुकूमशाहीमधे होते आणि सत्तेचा गैरवापर केला जातो. म्हणूनच घराणेशाहीला रोखणे आवश्यक आहे. पारनेर तालुक्यात सत्तेतील एकाधिकारशाही मुळे विकास कामांमध्ये प्रचंड कमीशनगिरी चालू झाली आहे.त्यामुळे कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत.विकासकामांचा दर्जा सुधारण्यासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. पारनेर तालुक्यात शासकिय कार्यालये, अधिकारी व सरकारी कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने भ्रष्टाचार, गुंडागर्दी, अवैध धंदे,वाळु तस्करी व अन्याय अत्याचार यांचे प्रमाण वाढले असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील सुडाच्या राजकारणाची दिशा बदलून विकासाचे नवे पर्व सुरु होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच एक सुशिक्षित, संयमी, सुसंस्कृत, अजातशत्रू व सर्वसमावेशक दुरदृष्टी असणारे नेतृत्व मा.काशिनाथजी दाते सर यांना तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी व तरुणांच्या उज्वल भविष्यासाठी पाठिंबा देण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खादी ग्रामोद्योग संघाचे व्हाइस चेअरमन राजेंद्र करंदीकर होते.यावेळी जेष्ठ कार्यकर्ते मधुकर पठारे, महेंद्र बोरुडे, श्रावण गायकवाड, शब्बीर इनामदार,ॲड.बाळासाहेब सोनवणे उपस्थित होते.तसेच पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष निकाळजे गटाचे किरणभाऊ सोनवणे,पारनेर तालुका बलुतेदार संघटनेचे बाळासाहेब शिरतार, खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक आण्णा खैरे,राजु पांढरे, ईश्वर पठारे, अविनाश देशमुख, ऋषिकेश बोरुडे, पारनेर विका सोसायटीचे संचालक शरद नगरे, निघोज विकाचे हिरामण सोनवणे,करंदी विकाचे संभाजी करंदीकर, दैठणे गुंजाळचे माजी सरपंच अंबादास जाधव, उपसरपंच संजय आंग्रे,जेष्ठ कार्यकर्ते दादाभाऊ पटेकर, माळकुपचे उपसरपंच विठ्ठल लष्करे, सुभाष गायकवाड,मनोज सुर्यवंशी,बाळासाहेब रोकडे, भीमशक्ती संघटनेचे योगेश सोनवणे, चर्मकार विकास संघाचे अशोक खैरे,युवा आघाडीचे प्रणल भालेराव, महिला आघाडीच्या आरती सोनवणे,मृणाली सुर्यवंशी,जय मल्हार संघटनेचे सुनिल भाखरे, रिपाइं युवा आघाडीचे प्रदीप मोरे,दलित महासंघाचे गणेश वाघ,अजय साळवे, रफिक राजे, सतिश सुर्यवंशी, निखिल गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शिंदे, बाळासाहेब सोनवणे, प्रदीप कसबे, सुनिल इधाटे, सुखदेव थोरात,कानिफ आंबेडकर, पांडुरंग आंग्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पाठिंब्याच्या पत्र काशिनाथ दाते सर यांच्या वतीने त्यांचा मुलगा मंगेश दाते यांनी स्वीकारले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने