प्रतिनिधी - सध्या राज्यभर गाजत खूप असलेल्या अन् साहित्य क्षेत्रात ग्रामीण कादंबरी म्हणून जिचा नावलौकिक आहे अशा
एक भाकर तीन चुली ह्या देवा झिंजाड लिखित कादंबरीला नुकताच चौथे छत्रपती शिवाजी महाराज अहमदनगर यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. तो पुरस्कार 25 डिसेंबर रोजी मोठ्या समारंभात दिला जाणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष रवींद्र शोभणे सर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
एक भाकर तीन सुली ह्या कादंबरीच्या एका वर्षाच्या आत आत्तापर्यंत सात आवृत्ती आलेल्या आहेत. साडेसहा हजाराहून अधिक कादंबऱ्या वाचकांनी वाचलेल्या आहेत. तसेच आजवर हजारो वाचकांनी समीक्षकांनी ह्या कादंबरी वरती आपले अभिप्राय नोंदवलेले आहेत.
देवा झिंजाड हे कवी आहेत लेखक आहेत त्यांचे मूळ गाव पारनेर तालुक्यातील गारखिंडी हे आहे.
अतिशय गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन देवा झिंजाड यांनी आपली साहित्यिक वाटचाल सुरू ठेवलेली आहे.
एक भाकर तीन चुली ह्या 425 पानांच्या वास्तववादी कादंबरीला आत्तापर्यंत राज्यातील महत्त्वाचे राज्यस्तरीय पुरस्कार लाभलेले आहेत.
हा सोळावा पुरस्कार आहे. एखाद्या कादंबरीला एवढे पुरस्कार मिळवणारे ते पहिले पारनेरकर आहेत. विशेष म्हणजे ह्या कादंबरीला विद्यावाचस्पती डॉक्टर आ. ह. साळुंखे सर यांची प्रस्तावना लाभलेली आहे.
तसेच या कादंबरी वरती एक विशेष समीक्षा ग्रंथ सुद्धा येत आहे त्याचे संपादन डॉक्टर राजाभाऊ भैलुमे सर करत आहेत.
याआधी देवा झिंजाड यांचा कवितासंग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे.
सगळं उलथवून टाकलं पाहिजे या कवितासंग्रहाला सुद्धा आत्तापर्यंत 15 राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
आणि 15 डिसेंबर रोजी त्यांचे मेंदूची मशागत नावाचे एक नवीन पुस्तक प्रकाशित होणार आहे.
पारनेर सुपुत्र देवा झिंजाड यांच्या ' एक भाकर तीन चुली ' या कादंबरीला राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0
