प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर येथील शेत जमिनीवर झालेले नियमबाह्य प्लोटिंगचे खरेदीखत समक्ष पंचनामा करून रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषणानंतर प्रशासनाच्या वतीने आश्वासन देण्यात आले होते.हे आश्वासन पाळले नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने २३ डिसेंबर रोजी जागरण गोंधळ आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
तालुक्यातील म्हसने सुलतानपूर येथील नियमबाह्य प्लोटिंग करून खरेदीखत झाल्याने ते रद्द करण्याबाबत संघटनेच्या वतीने दि. ७ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय ,विभागीय आयुक्त नाशिक यांना पत्र व्यवहार करून २१. ऑक्टोंबर रोजी उपोषण करण्यात आले होते. जिल्हाधिकरी गृहविभागाने सहजील्हा निंबधक वर्ग १ यांना पत्र दिले होते.या पत्रानव्ये उपोषणापासून परावृत्त करण्यात आले. आज अखेर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून देखील सहजिल्हा निंबधक वर्ग १ यांनी कोणतीही कारवाई केली नाही .असा आरोप करण्यात आला आहे असे निवेदनात म्हटले आहे.
खरेदीखत रद्द होण्यासाठी जागरण गोंधळ घालण्याचा इशारा - अन्याय निवारण निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष ,अरुण रोडे
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0