सुपा एमआयडिसी मधील मारहाणीचा व्हिडिओ सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद

*पारनेर प्रतिनिधी* - पारनेर तालुक्यातील सुपा एमआय डीसी परिसरात बेदम मारहाण झाली असुन, मारहाणीचा संपूर्ण राडा सीसीटिव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी प्रमोद ऊरमुडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन रमेश मुठे, प्रशांत दिलीप आंबेकर, पवन रमेश मुठे, साहील भाऊसाहेब आंबेकर, ज्ञानदेव दतु कार्ले आरोपींची नावे आहेत. व्हिडिओ मध्ये चित्रित झालेल्या त्या सदर व्यक्तीस पाच ते सहा जण लाथा आणि बुक्या तसेच लाकडी दांडक्यानी मारहाण करताना सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत असुन या मारहाणीत सदर व्यक्ती गंभीर जखमी झालेली असुन जखमी झालेल्या व्यक्तीवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालु असल्याचे सांगितले जात आहे.मारहाणीचे कारण अद्याप समजले नसून, सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक जेजोट मॅडम करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने