प्रतिनिधी - श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखान्यातील प्रत्येक घटकाबरोबरच, शेतकरी व विघ्नहर परिवाराच्या सुरक्षा व आरोग्याला कायम विशेष प्राधान्य दिले आहे.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत आज प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड पुणे व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर ऊस वाहतूक करताना त्यासंबंधित सर्व घटकांनी आपल्याबरोबरच इतरांच्या सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून वाहतूक करावी व इतर सुरक्षाविषयी ऊस वाहनचालकांसमवेत संवाद साधला.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सध्या ऊसतोड करून ऊस साखर कारखान्यावर पोहचवण्याची प्रक्रिया यंत्रणेमार्फत सुरू आहे. अनेक ट्रॅक्टर ट्रॉली, बैल टायर गाडी, ट्रक आदी वाहने गावागावातून प्रवास करत कारखाना कार्यस्थळावर पोहचत असतात. प्रवासात या वाहनांना अथवा इतर वाहनांना कोणताही अपघात होऊ नये. याबाबत प्रादेशिक परिवहन पिंपरी चिंचवड विभागाचे मोटार वाहन निरीक्षक जयंत मोरे साहेब व सहाय्यक निरीक्षक कोमल गाडेकर मॅडम यांनी उपस्थित सर्वांना रस्ते व वाहतूक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ऊस वाहतूक करताना वाहनावर कर्कश: आवाजात गाणे लावून वाहतूक करू नये, रिफक्लेटर रेडीयम पटटया झाकू नये, वाहन चालविताना भ्रमणध्वनीवर बोलू नये, मद्यसेवन करून वाहन चालवू नये. तसेच रिफ्लेक्टर कापड व रिप्लेक्टिव्ह रेडियम टेप वाहनांवर लावण्यात यावे असे आवाहन केले.
प्रसंगी कारखान्याचे सर्वश्री संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आपली सुरक्षा आपल्या हातात - सत्यशील दादा शेरकर
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0
