प्रतिनिधी - पुणे जिल्ह्यातील शिवपानंद शेतरस्त्यांचा प्रश्न गंभीर झाला असुन पिढ्यांना पिढ्या शेतरस्त्यांचा शेतकऱ्यांचा प्रशासकीय न्यायालयीन संघर्ष संपवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने सरकार प्रशासणाचे लक्ष वेधण्यासाठी ऐतिहासिक 'पेरू वाटप आंदोलन' करण्यात आले जिल्हा प्रशासनाने २ दिवसात कालबद्ध महाराजस्व अभियान राबवण्याचे आदेश काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेतले -शरद पवळे दादासाहेब जंगले पाटील (महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळ)
पुणे जिल्ह्यातील शेतरस्त्यांच्या प्रश्नावर पुणे जिल्हाधिकार्यालयावर पुकारलेल्या पुणे जिल्हयातील शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या पराधिकाऱ्यांनी शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित कराव्यात,वहिवाटीच्या रस्त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घ्याव्यात,तहसील कार्यालयावरील प्रलंबित शेतरस्ता केसे तातडीने पूर्ण करा,नकाशावरील सर्व नकाशावरील शेतरस्त्यांना नंबरी लावून त्यांचे सर्वेक्षण करावे व नंबरी हटवणारांना दंड सुरू करावा , शेतरस्त्या अभावी जमिनी पडीक राहणाऱ्या भुधारकांना विनाअट नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांचे आंदोलन करण्यात आले होते यावेळी शेतकऱ्यांनी कार्यालयावर घोषणाबाजी करत पेरू वाटप अंदोलन सुरू करताच पोलिस प्रशासणाणे मध्यस्थितीची भुमिका घेतली यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशीला देशमुख- मोहिते यांनी तातडीने संबंधित सर्व विभागांना संपर्क साधत नियोजनबद्ध रूपरेषा आखत तालुका प्रशासनाला कालबद्ध महाराजस्व अभियान राबवण्याचे दोन दिवसात परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले यावेळी सुरेश वाळके,सचिन शेळके, शांताराम पानमंद,राहुल शिंदे,बबन दाभाडे ,योगेश भोस ,सचिन वाळुंज ,सविता वाळुंज, सुमन भंडारी, गोपीनाथ नरवडे,लक्ष्मण धुमाळ, शिवाजी शिवले, नानासाहेब काळे, दत्तात्रय बांगर, सुनिल शेळके, पंकज गायकवाड, प्रताम देशमुख, अरुण नरवडे, नानासाहेब काळे, भास्कर हिंगे, श्रीहरी पाटोळे, निलेश लवांडे,संकेत लवांडे, प्रकाश वाखारे,विक्रम भोगावडे, हनुमंत पडवळ,युवराज कळसकर,शांताराम चव्हण, काळूराम पवार,आनंदा टेमगिरे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी प्रसार माध्यमांसह प्रशासणाचे आभार मानले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरील " पेरू वाटप आंदोलन " घोषणाबाजीने दणाणले
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0
