प्रतिनिधी - आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास व गृहनिर्माण मंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष, आरएसबी फाऊउंडेशन आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर लोकसभा मतदार संघातील कान्हूर मेसाई, ता.शिरूर या गावात बोअरवेल पुनरुज्जीवित करण्याच्या प्रकल्पाचे काम करण्यात आले होते त्याचे उद्घाटन संपन्न झाले.
आरएसबी फाउंडेशन आणि सेवा सहयोग फाउंडेशनच्या ३० लक्ष रुपयांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले होते. याद्वारे या भागातील नागरिकांना जास्त काळ पाणीसाठा उपलब्ध होणार असून त्यांची पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे या बद्दल तेथील ग्रामस्थांनी एकनाथजी शिंदे साहेबांचे आभार मानले.
यावेळी एकनाथजी शिंदे साहेब , आमदार शरद दादा सोनवणे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आरएसबी ग्रुपचे कार्यकारी संचालक रजनीकांत बेहेरा, आरएसबी ग्रुपच्या सीएसआर विभागाच्या प्रमुख प्रियंका बेहेरा आणि सीएसआर विभागाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी चेतन कुसाळकर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बोअरवेल पुनरुज्जीवित प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न
byसंघर्ष मराठी 24 न्यूज
-
0
