हर्षवर्धन सकटे यांची इंटेलिजन्स ब्यूरो अधिकारी पदी निवड

संघर्ष मराठी २४ न्युज 

प्रतिनिधी - दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष     मा.डॉ.प्रा.मच्छिंद्रजी सकटे सर आणि दलित महासंघाच्या महिला आघाडी अध्यक्षा प्रा.सौ पुष्पलता सकटे मॅडम यांचे चिरंजीव हर्षवर्धन सकटे यांची इंटेलिजन्स ब्युरो (I.B.) अधिकारी पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा दलित महासंघ अहिल्यानगर जिल्हाच्या वतीने कराड येथील निवासस्थानी  सत्कार करण्यात आला त्यावेळी दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष मा.संजय चांदणे, जिल्हासंपर्कप्रमुख कडूबाबा लोंढे, महिला आघाडीच्या नेत्या अरुणाताई कांबळे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सकट, जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र शेंडगे, कर्जत तालुकाध्यक्ष बबनराव उकिर्डे महाराज, नानभाऊ कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने