राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पारनेर ला 'स्वराज्य सप्ताह' चे आयोजन- तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांची माहिती

प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने १९ ते २७ फेब्रुवारी दरम्यान 'स्वराज्य सप्ताह' चे आयोजन करण्यात आले आहे.'राज्य रयतेचे – जिजाऊंच्या शिवबाचे' या टॅगलाईन अंतर्गत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे.युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पक्षाच्यावतीने 'स्वराज्य सप्ताह' साजरा करणे व महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी आपला पक्ष जोडलेला आहे, हे नतेसमोर मांडणे यासाठी पक्षाने शिवराय केंद्रीत विविध पक्रम राबविले जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडणे आणि राष्ट्रीय अध्यक्षआणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवरायांच्या रयतेचे राज्य या संकल्पनेतून शासन चालवण्याची प्रेरणा घेतो हा उद्देशलो कांसमोर ठेवण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम निमित्ताने पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस  पार्टीच्या वतीने  बुधवार दिनांक १९/०२/२०२५ रोजी सकाळी ठीक १०.१० वा. 'शिवजयंती सोहळा 'तसेच स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने आमदार काशिनाथ दाते सर यांचे संपर्क कार्यालय पारनेर येथे उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर सौ. सुषमा रावडे महिलातालुकाध्यक्ष.श्री. भास्कर उचाळे युवक तालुकाध्यक्ष.सौ. अपर्णा खामकर युवती तालुकाध्यक्ष.पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पारनेर यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने