पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दि.२२ फेब्रुवारी (शनिवार) सायंकाळी साडेचार वाजता भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लाभार्थ्यांना रक्कम वितरण करण्यात आली.
हा लाईव्ह कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा कातळवेढे येथे दाखवण्यात आला.
कार्यक्रमानंतर लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी, पियूष गाजरे(सरपंच) अजितशेठ भाईक ग्रा.सदस्य, रामदास सांगळे ग्रामसेवक , जिल्हा, परिषद शाळा शिक्षिका श्रीमती घोडे मॅडम, ग्रामपंचायत संगणक चालक बन्सी चव्हाण, बबन गुंड (ग्रामपंचायत शिपाई) पाणी पुरवठा कर्मचारी गोरख कडूसकर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गुंड,सामाजिक कार्यकर्ते संभाजी भाईक पत्रकार गणेश वाघ व सर्व घरकुल लाभार्थी उपस्थित होते.
