प्रतिनिधी - दलित महासंघ , लाल सेना,आणि सर्व मातंग समाजातील संघटनेच्या वतीने बुधवार दिनांक ५ मार्च २०२५ रोजी आरक्षण वर्गीकरणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद संजय ताकतोडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईच्या आझाद मैदानावर " मांगवीर महामोर्चा" चे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ.प्रा.मच्छिंद्रजी सकटे सर , मा .गणपत भिसे यांच्यासह राज्यातील २५ संघटनांनी आयोजन केलेले आहे, सदर मोर्चामध्ये महाराष्टातील वेगवेगळ्या संघटनातील कार्यकर्त्यांनी, समाजातील लोकानी , नेत्यांनी सहभागी व्हावे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध संघटना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार दिनांक २६/२/२०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता शासकीय विश्रामगृह ,अहिल्यानगर येथे बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.
तरी समाजातील सर्व संघटना व चळवळीतील कार्यकत्यांनी "मांगवीर महामोर्चा" यशस्वी करण्यासाठी मोठ्यासंखेने बैठकीस उपस्थित राहून मार्गदर्शन करावे असे आवाहन दलित महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ सुलाखे पाटील यांनी केले आहे.
