म्हसोबा यात्रेनिमित्त आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची बेलपांढरी येथे रस्ता भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे

बेलपांढरी ता. नेवासा येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त आज नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दर्शन घेतले व ग्रामस्थांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या. 

तसेच म्हसोबा महाराज मंदिर स्थानाला जोडणाऱ्या रस्त्याला १० लक्ष रुपये निधी देऊन सदर रस्त्याचे कामाचे नारळ फोडून भूमिपूजन केले. सदर रस्त्याचे पुढील आठ दिवसात काम सुरू होणार असून लवकरच हा रस्ता पूर्ण होणार आहे. त्यानिमित्ताने बेलपांढरी व परिसरातील ग्रामस्थांनी आमदार श्री. विठ्ठलराव लंघे साहेबांचे आभार मानले. 

यावेळी माऊली गारुळे, माजी सरपंच साहेबराव गारुळे, गणेश चौगुले सर, कुणाल बोरुडे, राहुल शिंदे, दगडू गारुळे, नामदेव गारुळे, बाळासाहेब गारुळे, गंगाराम धोत्रे, प्रदीप गारुळे, सारंगधर गारुळे, कुंडलिक झिंजुर्डे, प्रकाश धोत्रे यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने