नेवासा नगरपंचायतीच्या गाळेधारकांचे दुकानाला जप्ती चे कारवाईने हात लावल्यास रस्त्यावर उतरू ;राजेंद्र पोतदार

 


प्रतिनिधी -  नाथाभाऊ  शिंदे 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजित पवार गट जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील लोकप्रतिनिधीना निवेदन सादर केले आहे त्यात असे म्हटले आहे की नेवासा नगरपंचायतीचे  नेवासा शहरात शाॅपीग सेंटर आहे यांत गाळेधारक नियमित भाडे पट्टी भरत आले आहेत परंतु मागील काही वर्षांपासून कोरोना काळापासून नेवासा बाजारपेठ उध्वस्त झालेली आहे व्यापाऱ्यांना थकीत भाडे पट्टी वर मुख्याधिकारी नगरपंचायत नेवासा यांनी 24 टक्के शास्ती कर लावुन  नोटीस बजावल्या आहेत यामुळे गाळेधारक व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.गाळेधारकाना या जुलमी शास्ती करातुन मुक्त करून जप्ती नोटीस कारवाई रद्द करण्यात यावी. अहिल्यानगर जिल्ह्यातील इतर नगर परिषदांनी शास्ती करात  शंभर टक्के सवलत सूट दिलेली आहे . गाळेधारकांना सदर कारवाई रद्द होणे  बाबत व शास्ती माफी बाबत आपन वरीष्ठ स्तरांवर प्रयत्न करावे . सध्या परिस्थितीत नेवासा बाजारपेठ उध्वस्त झालेली आहे अशात नेवासा नगरपंचायत येथील गाळेधारकांनवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार यांनी निवेदनात म्हटले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने