श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या जन्मभूमी मध्ये जुने गोधेगाव येथे गुढीपाडवा महोत्सव साजरा


 प्रतिनिधी/ नाथाभाऊ शिंदे पाटील

दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा जन्मभूमी जूने गोधेगाव येथील किसनगिरी बाबा मंदिर येथे पाडवा जन्मभूमी महोत्सव निमित्त दरवर्षीप्रमाणे देवगड संस्थांन चे महंत गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज यांचे हरिकीर्तन झाले व त्या ठिकाणी श्री सद्गुरू संत किसनगिरी बाबा यांच्या जन्मभूमी मध्ये गुढीपाडवा व नववर्ष स्वागत महोत्सव संपन्न झाला

 त्यानिमित्त आज नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री विठ्ठलराव लंघे पाटील यांनी भेट देऊन दर्शन घेतले व भाविकांना गुढीपाडव्यानिमित्त व नववर्षा च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे ,प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे,देवगडचे सरपंच अजय साबळे, चेअरमन नवनाथ पाटील पठाडे, संजय दुशिंग,श्रीधर अनभुले,सतीश गायकवाड,बाबासाहेब जाधव,बबन औटे,नवनाथ गाडेकर,गणेश मुखेकर,ऋषिकेश गाडेकर आदी व ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचा सन्मान करण्यात आला प्रसंगी देवगड भालगाव गोधेगाव परिसरातील भाविक-भक्त, ग्रामस्थ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने