जायकवाडी धरणग्रस्तांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विधानसभा भवनात लक्षवेधी सूचना ; आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील

प्रतिनिधी: नाथाभाऊ शिंदे पाटील

नेवासा तालुक्यासह शेवगांव,गंगापूर व पैठण तालुक्यातील जायकवाडी धरणासाठी कवडीमोल भावाने जमिनी संपादित केल्या गेल्या 700 ते 1200 बाराशे रुपये प्रत्येक एकराने घेतल्या गेल्या त्यामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना गावकऱ्यांना म्हणावे तसेच नागरी सुविधा उपलब्ध करून दिले गेलेले नाहीत तसेच शेत रस्ते आता खराब झालेले आहेत शेत रस्ते सुधारून डांबरीकरण करून द्यावेतजायकवाडी धरणग्रस्त पुर्नवसित गावांचे मुल्यमापन प्रस्ताव राज्य सरकारने तयार करुन या तालुक्यातील गावांना नागरी सोयीसुविधा मिळाव्यात अशी मागणी नेवासा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठलराव लंघे - पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्षांकडे करुन जायकवाडी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका घेतल्यामुळे या सर्व तालुक्यातील पुर्नवसित गांवकऱ्यां कडून आमदार श्री विठ्ठलराव लंघे पाटील अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने