नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जनन्याय दिनाचा विशेष कार्यक्रम

प्रतिनिधी/ नाथाभाऊ शिंदे

नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध समस्यांवर उपाय योजण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीने जनन्याय दिनाचे आयोजन केले. हा कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी तहसील कार्यालयात होतो. नुकत्याच २० मार्च २०२५ रोजी झालेल्या जनन्याय दिनात, तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार, नायब तहसीलदार किशोर सानप, संदीप चिंतामणी आणि इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व प्रकरणे हाताळली. यावेळी १४३ व ५/२ ही रस्ता प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत याची हमी दिली गेली.

चळवळीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान

नेवासा तालुक्यातील शिवरस्त्यांच्या हद्दी निश्चित करण्यातील सहकार्याबद्दल तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार यांचा चळवळीच्या उपाध्यक्ष नाथाभाऊ शिंदे पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला गेला. पोलीस स्टेशनचे पीआय धनंजय जाधव यांनीही विनाशुल्क पोलीस बंदोबस्त पुरविल्याबद्दल चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा गौरव केला. या कार्यक्रमात उपाधीक्षक भूमी अभिलेख संदीप गोसावी यांनीही सहभाग घेतला.

या जन न्याय दिनाचे वेळी महाराष्ट्र राज्य शेत व शिवपानंद चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील, श्री सागर सोनटक्के, बाळासाहेब थोरात विठ्ठल करमड. संभाजी पवार प्रवीण पवार, श्री शैलेश नारायणराव सुरुडे, जानकु रुपनर,साहेबराव आखाडे श्री संतोष भाऊसाहेब शिंदे कुशाबा फुल सौंदर रमेश भक्त, सोमनाथ माकोणे रामभाऊ पवार, मुरलीधर जरे चांगदेव आरगडे व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .

पुढील जनन्याय दिनाची तारीख

पुढील जनन्याय दिन ३ एप्रिल २०२५ रोजी होईल असे जाहीर करण्यात आले. शेतकऱ्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने