वरील दोन्ही घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबांचे पुनर्वसन करून शासनाच्या वतीने 50 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी तसेच खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून लवकरात लवकर पीडितांना न्याय मिळवून देण्यात यावा त्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले त्यावेळी प्रदेशाध्यक्ष काशिनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, जिल्हा कार्याध्यक्ष कडू बाबा लोंढे, महिला आघाडीच्या अरुणा कांबळे, मंदाकिनी मेंगाळ, युवक आघाडीचे चंद्रकांत सकट, सुरेंद्र घारू,जिल्हाउपाध्यक्ष विशाल भालेराव, बंडू पाडळे,किशोर वाघमारे, विजय वडागळे,सुधीर वैरागर,संदीप लोंढे नरेश शर्मा,राहुल ठोकळ, अनिल भालेराव,महादेव साठे, यश ससाणे,सुरज उमाप, मीरा ठोकळ, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
