प्रतिनिधी - कृषी विभागाच्या मार्फत विविध योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात असून सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत योग्य समुपदेशन करत या योजना राबविल्या पाहिजेत. शेतकऱ्यांनी विविध योजना राबवत असताना कृषी विभागाशी संपर्क साधून सविस्तर माहिती घ्यावी या सर्व योजना ऑनलाइन राबवल्या जात असून लाभार्थ्यांनी कामाचा अध्यादेश आल्यानंतरच कामाला सुरुवात करून कामे मार्गे लावली जावीत यामुळे कुठलाही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही असे मत आमदार काशिनाथ दाते सर यांनी व्यक्त केले आहे.
गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात अनुदान योजनेच्या तालुक्यातील ३६ लाभार्थ्यांना ७१ लाखांचे अनुदान मंजुर झाले असून या योजनेचा धनादेश प्रमाणपत्र वितरण आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते संपर्क कार्यालय येथे करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, खादी ग्रामोद्योग अध्यक्ष हसन राजे, उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर नगरे, ॲड. युवराज पाटील, कृषी अधिकारी गजानन घुले, आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते .
यावेळी पुढे बोलताना आ. दाते सर म्हणाले की, मी आमदार होण्यापूर्वी देखील मी सातत्याने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांसाठी मिळावा यासाठी कृषी विभागाशी कायमच पाठपुरावा केला असून आमदार झाल्यानंतर कृषी विभागाची निगडित असलेले पहिले जे काम केले असेल तर ते अपघात ग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत मिळवण्यासाठी केले आहे.
तालुक्यातील रस्ते अपघातात, विजेच्या धक्क्याने,पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्या ३६ कुटुंब सानुग्रह अनुदानापासून वंचित होते. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, यांच्याशी पत्रव्यवहार करत भेट घेऊन तात्काळ या कुटुंबांना मदत शासनामार्फत करावी अशी विनंती केली होती. या मागणीची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती ही रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
शेतकरी कुटुंबातील कर्ता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबातील व्यक्तींसाठी दोन लाख रुपये ही रक्कम पुरेशी नाही मात्र फुल ना फुलाची पाकळी म्हणून सरकारकडून त्या कुटुंबाला मदत म्हणून ही रक्कम दिली गेली आहे. या कुटुंबियांशी मी कायमच पाठीशी असल्याचे आमदार दाते सर यांनी सांगितले.
कुटुंबामध्ये जमीन जर आजोबाच्या नावावर असेल तर आणि त्या कुटुंबातील नातवाचे अपघाती निधन झाले तर त्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे अपघाती निधन योजनेचा लाभ मिळत नाही यासाठी या योजनेमध्ये धोरणात्मक बदल करणे आवश्यक असून यासंदर्भात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी चर्चा करून या योजनेचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे .आमदार काशिनाथ दाते सर
अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नावे व मंजूर झालेल्या अनुदानाची रक्कम पुढीलप्रमाणे
सतोष बबन बोरुडे,पारनेर (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,कुंडलिक किसन शिर्के,बाभूळवाडे (रस्ता अपघात मृत्यू)२ लाख ,दत्तात्रय वाळू गायकवाड,कोहकडी (विजेचा धक्का मृत्यू) २ लाख, दत्तात्रेय सुदाम नरोडे,सिद्धेश्वरवाडी (विषबाधा) २ लाख,महादेव नामदेव फटांगडे, राळेगणसिद्धी (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,अंकुश महादू मुळे,शेरी कासारे (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख पांडुरंग गणपत ठुबे,कान्हूर पठार(रस्ता अपघात अपंगत्व) १ लाख,कुशिनाथ रंगनाथ हुलावळे,खडकवाडी(रस्ता अपघात मृत्यू)नामदेव खंडू चौधरी,सावरगाव(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,दत्तात्रय रामराव शिंदे,रांजण गाव मशीद(रस्ता अपघात मृत्यू)२ लाख,वत्सलाबाई राधाकृष्ण चत्तर,सिद्धेश्वरवाडी(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,सुवर्णा सुनिल भुजबळ,काळकुप(पाण्यात बुडुन मृत्यू) २ लाख,सिद्धेश पोपट सिनारे,शिरापूर(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,सुमन किसन चाटे,शिरापूर (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,वैभव आण्णा शिंदे,पानोली (विजेचा धक्का) २ लाख,प्रतिक्षा कचरू सोनवणे,पुणेवाडी (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,नामदेव गंगाराम गुंड,काटाळवेढा(विजेचा धक्का) २ लाख,धोंडिभाऊ चिमाजी डोगरे,डोंगरवाडी (रस्ता अपघात मृत्यू)२ लाख,आशुतोष ज्ञानदेव गोपाळे,गुणोरे (विहिरीत पडुन मृत्यू) २ लाख,दत्तात्रेय गंगाराम नांगरे,गोरेगाव(पाण्यात बुडुन मृत्यू) २ लाख,मच्छीद्र तारामण पवार,वाळवणे(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,महेश संजय नाईक,रुई छत्रपती(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,भिमराज पाराजी ठाणगे,तिखोल,(रस्ता अपघात मृत्यू), २ लाख,सुनिल विठोबा भागवत,धोत्रे बुद्रुक(पाण्यात बुडुन मृत्यू)रविंद्र गुजाभाऊ भनगडे,भनगडे वाडी(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,चेतन मंच्छीद्र भांड,धोत्रे बुद्रुक (विजेचा धक्का) २ लाख,संतोष विठ्ठल ढगे रांजणगाव मशीद(विजेचा धक्का) २ लाख, गणेश भास्कर दळवी,हंगे (विजेचा धक्का),२ लाख,ज्ञानेश्वर रावसाहेब गायकवाड,वाळवणे(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख,कलाबाई गंगाराम क-हे,ढवळपुरी (रानडुक्कर प्राण्याचा हल्ला) २ लाख,मंदाबाई रामदास पानमंद,म्हस्केवाडी(रस्ता अपघात मृत्यू) २ लाख, भिकाजी खंडू कुटे,ढवळपुरी(विजेचा धक्का) २ लाख,संतोष दत्तात्रय वरशिले,जवळे(विजेचा धक्का) २ लाख,बाळू बापु शेळके,वाडेगव्हाण(रस्ता अपघात मृत्यू),२ लाख,योगेश शिवाजी भालेकर ,वडनेर हवेली(रस्ता अपघात मृत्यू),२ लाख, मारुती रामभाऊ कदम, पिंपरी जलसेन (रस्ता अपघात मृत्यू) २ लाख.
