प्रतिनिधी - जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जिर्ण झालेल्या वर्ग खोल्यांचे निर्लेखन करून त्या जागेवर नव्या खोल्या बांधण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत २ कोटी ४० लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.
जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून वर्ग खोल्या बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून त्यामाध्यमातून हा निधी मंजुर करण्यासंदर्भात खा. लंके यांनी जिल्हा नियोजन विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे २० शाळा खोल्या बांधकामासाठी प्रत्येकी १२ लाख रूपये मंजुर करण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानुसार या वर्ग खोल्यांसाठी एकूण २ कोटी ४० लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी नगर दक्षिण मतदारसंघातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. आलेल्या प्रस्तावांनुसार निधी मंजुरीसाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत जिल्हाधिका-यांना निधी मंजुरीचे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार हा निधी मंजुर करण्यात आला आहे. म्हस्केवाडी येथील शाळेला दोन तर उर्वरीत शाळांना प्रत्येकी एक खोली मंजुर करण्यात आली आहे.
या शाळांना मिळणार वर्ग खोल्या
शिराढोण ता. नगर, देहरे पांढरेवस्ती ता. नगर, रांधे ता. पारनेर, म्हस्केवाडी ता. पारनेर, काळकूप ता. पारनेर, कोहकडी पवारवाडी ता. पारनेर, ढवळपुरी रानमळा ता. पारनेर, ढवळपुरी खारवाडी ता. पारनेर, हंगा मोकाते मळा ता. पारनेर, बाभुळवाडे नवलेवाडी, ता. पारनेर, भोयरे गांगर्डा ता. पारनेर, ढवळगांव ता. श्रीगोंदे, श्रीगोंदे, ता. श्रीगोंदे, बेलवंडी उत्तर हिरवेवाडी ता. श्रीगोंदे, येळपणे पवारवाडी ता. श्रीगोंदे, येळपणे सांगळेवाडी ता. श्रीगोंदे, सावरगांव, काळेवाडी, ता. पारनेर वडगांव तांदळी ता. नगर
