प्रतिनिधी - काल दि .८मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त केडगाव परिसरात राहणाऱ्या महिलांसाठी, महिलांच्या सन्मानार्थ महिलांचे स्थान सदैव उच्च ठेवण्यासाठी, योग साधनेने तिची मानसिक व शारिरीक शक्ति सशक्त आणि स्थिर ठेवण्यासाठी कार्यरत 'कर्मयोगी योग स्टुडिओ' च्या संचालिका आहारतज्ञ ज्योती येणारे आणि मानवता फाऊंडेशन संचालित अ फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूल च्या संचालिका मोनिका कुसळकर यांच्या संकल्पनेतून योगसाधक महिलांचे योग आधारित नृत्य व इतर सहभागी महिलांचे बॉलीवूड आधारित नृत्य यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेल्या महिलांसाठी वेगवेगळे खेळ घेण्यात आले.एक मिनिट प्रश्नमंजुषा आणि संगीत खुर्ची मध्ये कुसुम घुले, रत्नमाला भोर,रजनी तांदळे, सिद्धी तांदळे, सृष्टी येणारे , मीनाक्षी काठमोडे ,अनुराधा येणारे, संगीता जाधव, मनीषा शिरसाट सीमा चंदन ,दहिफळे ,अश्विनी घोडके ,रोशनी कवडीवाले, प्रियांका शिंगवी, विराज जायभाय यांनी बक्षिसे जिंकली. लकी ड्रॉ मध्ये सृष्टी येणारे ,रोशनी कवडीवाले, प्रियांका शिंगवी, यांनी बक्षिसे जिंकली.
आहार तज्ञ ज्योती येणारे यांनी आहार आणि योग यांची सांगड घालून महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले, तर अ फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूलच्या संचालिका मोनिका कुसळकर यांनी मुलांचे बालपण जपून हसत खेळत डिजिटल शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
इट्स फ्युजन यांच्यातर्फे सहभागी महिलांना महिला दिनानिमित्त आरोग्यासाठी पोषक आणि हलके असे ओट्स चे पॅकेट भेट देण्यात आले.
अमृता बरमेचा यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले कर्मयोगी योगा स्टुडिओ च्या संस्थापिका गायत्री गार्डे ह्या ही उपस्थिती होत्या .महिलांनीच महिलांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्त्री शक्तीचा जागर करत महिलांनी आनंदाची लय लूट केली.
