![]() |
| संघर्ष मराठी २४ न्युज |
महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचे नियोजन, हद्द निश्चिती, रस्ते क्रमांकन आणि अतिक्रमणमुक्ती प्रक्रिया अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील तब्बल 44 हजार गावांचे GIS (Geographic Information System) आधारित नकाशे ऑनलाइन उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, या ऐतिहासिक निर्णयासाठी शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.
सरकार व प्रशासनासोबत चळवळीचे पदाधिकारी निस्वार्थ पद्धतीने कार्य करत असताना राज्यात शिव पाणंद चळवळीच्या पाठपुराव्यामुळे हजारो शेतरस्ते खुले होत आहेत, हद्द निश्चितीची कामे जलद गतीने सुरू आहेत आणि मजबुतीकरणासाठी प्रयत्न अधिक तीव्र होत आहेत.
शेतरस्त्यांसाठी महत्त्वाचा मैलाचा दगड
शरद पवळे यांनी “शेत तिथे रस्ता – गाव तिथे समृद्धी” या ध्येयवाक्याच्या माध्यमातून ग्रामस्तरावर जनजागृती करत शासन दरबारी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवले. त्यानंतर शासनाने गावनकाशे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यासाठी महसूल, नगररचना आणि ग्रामविकास विभागांना एकात्मिक प्लॅटफॉर्म तयार करण्याचे निर्देश दिले.
GIS आधारित नकाशांची वैशिष्ट्ये
गावातील शेतरस्ते, पायमार्ग, पाणीमार्ग, सार्वजनिक रस्ते यांची अचूक व डिजिटल नोंद
हद्द निश्चिती, रस्ता रुंदीकरण, अतिक्रमणमुक्तीसाठी विश्वासार्ह तांत्रिक आधार
ग्रामपंचायतींना विकास आराखडे तयार करण्यास सुलभता
एका क्लिकवर नकाशे पाहणे, डाउनलोड करणे व तांत्रिक पडताळणी
महसूल – नगररचना – ग्रामविकास या तीन महत्त्वाच्या विभागांचा समन्वय
शेतकऱ्यांसाठी ठोस फायदे
शेतरस्त्यांची अधिकृत ऑनलाइन नोंदणी
वाद–विवाद मिटविण्यासाठी स्पष्ट व प्रमाणित पुरावे
पिकविमा, विकासकामे, दुरुस्ती यासाठी नेमकी माहिती
अतिक्रमणमुक्ती मोहिमेला गती आणि पारदर्शकता
राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये GIS नकाशांची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून आता हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे.
“हा उपक्रम राबविल्याने ग्रामीण भागातील रस्ते व्यवस्थापन, पायाभूत सुविधा नियोजन आणि शेतकरी कल्याणाच्या दिशेने नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे,” असे महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. शरद पवळे
