भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून अंबाडे यांची नवी धुरा; नगर राजकारणात ठरतील ‘गेमचेंजर’


अहिल्यानगर –प्रतिनिधी- सुयश नरसाळे

कट्टर हिंदुत्ववादी, अभ्यासू,उच्चशिक्षित,शांत स्वभावाचे आणि प्रभावी नेतृत्वासाठी ओळखले जाणारे ॲड. ऋषिकेश अंबाडे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा – अहिल्यानगर शहर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली असून, या निवडीने शहरातील तरुणाईत उत्साहाची लाट उसळली आहे. शहरभरात त्यांच्या निवडीचे स्वागत होत असून, विशेष म्हणजे या निवडीनंतर आगामी अहमदनगर महानगर पालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या चर्चेत त्यांच्या नावाला वेग आला आहे.

विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक प्रश्नांवरील सक्रियता, युवक मार्गदर्शन,गोरक्षण, कायदेविषयक सेवा, जनसंपर्क, विविध सेवाभावी उपक्रम आणि पक्षातील संघटनात्मक भूमिकांमुळे अंबाडे यांच्या व्यक्तिमत्त्वाला सातत्याने आकार मिळत गेला. सर्वसामान्यांशी सलोख्याचे नाते आणि मुद्देसूद, कारभारक्षम दृष्टीकोन यामुळेच त्यांची जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड ही ‘योग्य व्यक्तीला योग्य संधी’ ठरल्याचे मानले जात आहे.

निवडीनंतर शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षा व्यक्त होत आहेत की आता युवकांसाठी रोजगारनिर्मिती, कौशल्यविकास, क्रीडा सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि सकारात्मक नेतृत्वनिर्मिती यांसारख्या क्षेत्रात आणखी व्यापक उपक्रम राबवले जातील.

दरम्यान, अहिल्यानगर महानगर पालिका राजकारणातही त्यांच्या नावाला गती मिळाल्याने नवीन समीकरणे तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अंबाडे हे डॉ. सुजय विखे पाटील यांचे खंदे समर्थक असल्याने शहरातील विकासकामांना गती मिळण्यास मोठी मदत होईल, असे राजकीय वर्तुळातही बोलले जात आहे. विखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना अंबाडे यांच्या निवडीमुळे संघटनाला नवा उर्जा स्रोत मिळाला असल्याचे स्पष्ट दिसते.
नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर विविध विभागांतील शेकडो युवकांनी  अंबाडे यांचा सत्कार व सन्मान केला. त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपा युवा मोर्चा संघटन मजबूत होऊन आगामी नगर निवडणुकीत भाजपा अधिक प्रभावीपणे रिंगणात उतरेल, असा विश्वास नागरिक आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

ॲड. ऋद्रेश अंबाडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून झालेली निवड केवळ युवा मोर्चासाठी नव्हे, तर संपूर्ण नगरच्या राजकारणासाठी आगामी काळात निर्णायक ठरणार असल्याची चर्चा शहरभर रंगत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने