पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार ज़िल्हा परिषद गटातील पुणेवाडी येथे भाजप समर्थकांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील दहशतीच्या राजकारणाला झुगारून सुरक्षित आणी सुसस्कृत पारनेर साठी साथ द्या. असे आव्हाहन केले.
गेली पन्नास वर्षे विखे परिवारातील सदस्य यांनी समाजिक , शैक्षणिक, आरोग्य व सहकार क्षेत्रात काम केले .पण,कधी जाहिरात केली नाही. अनेक रुग्णांना विळद घाट येथील रुग्णालयात जीवनदान मिळाले.मात्र त्याचे कधी व्हिडीओ ,फोटो प्रसारीत केला नाही. विरोधकांकडून छोटया छोटया गोष्टीचा बाऊ केला जात आहे. शोशल मीडियावर नाटकीपणा विरोधक करतात. मी शोशल मीडियावर खोटेपणा कधीच केला नाही.
यावेळी विश्वनाथ दादा कोरडे, राहुल शिंदे, काशिनाथ दाते सर, विकास रोहकले, प्रशांत गायकवाड, गणेश शेळके ,युवराज पठारे, बाबासाहेब खिलारी, राजाराम एरंडे, गजानन औटी, सोनाली सालके,किरण कोकाटे,दत्तात्रय पवार, सुनील थोरात , रवी पुजारी, बाळासाहेब रेपाळे, सुहास पुजारी उपस्थित होते.
