भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 बाबत आत्ताच एक मोठी गुड न्यूज दिली आहे. ती म्हणजे यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मान्सूनचे आगमन दोन दिवस आधी होऊ शकते. नैऋत्य मोसमी वारे अर्थातच मान्सून यंदा अंदमानात 19 मे ला दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
दरवर्षी मान्सूनचे अंदमानत 21 मे च्या सुमारास आगमन होत असते यंदा मात्र दोन दिवस आधीच मानसून अंदमानात पोहोचणार आहे. यानंतर केरळ आणि मग आपल्या महाराष्ट्राच्या तळ कोकणात मान्सूनचे आगमन होईल आणि तदनंतर संपूर्ण महाराष्ट्र मान्सून काबीज करणार आहे. खरेतर मान्सून सुरू झाला की पर्यटकांचे पाय आपोआप पर्यटन स्थळांकडे वळत असतात.