रस्त्यांच्या कामांसंदर्भात उच्चस्तरीय बैठक ; खा. नीलेश लंके यांनी घेतला आढावा

प्रतिनिधी - अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघात निवडणूकीदरम्यान दिलेल्या विकास कामांची पुर्तता करण्यासाठी विविध भागांतील रस्ते आणि महामार्गांच्या कामांना गती देण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत खा. नीलेश लंके यांनी विविध कामांचा आढावा घेतला. 

       नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, तांत्रीक तज्ञ, अभियंते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

       या बैठकीत छत्रपती संभाजीनगर-पुणे ग्रीन फिल्ड महामार्ग, सुरत-चेन्नई महामार्ग, पैठण पालखी मार्ग आणि इतर महत्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडचणी, निधी वितरण, विविध प्रकारच्या परवाणग्या, तांत्रीक बाबी आणि जमीनींचे अधिग्रहण याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. कामांमध्ये येणारे अडथळे दुर करून कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांना खा. लंके यांनी यावेळी ठोस सुचना दिल्या. 

बैठकीस मा. नगरसेवक दीप चव्हाण, योगीराज गाडे, गिरीश जाधव, प्रकाश पोटे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक वसंत पंधेकर, साईट इंजिनिअर ओंकार देवकर, कार्यकारी अभियंता शेवाळे, सर्व्हेअर मुजीफ सययद, महेश मिश्रा, निवासी अभियंता अलोक सिंग, शाखा अभियंता शोएब फकीर, उपविभागीय अभियंता अजित गायके, घटमल, राखाडे व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

महत्वाच्या प्रकल्पांवर चर्चा  

राहुरी-बारगांव नांदूर-जांभळी-वावरथ-भोकरदरा-ढवळपुरी हा नगर-कल्याण महामार्गाला जोडणारा रस्ता, राहुरी येथे बायपास अथवा फलाय ओव्हर ब्रीज उभारणी, नगर शहरातील पत्रकार चौक ते सहयाद्री चौकादरम्यान फ्लाय ओव्हर ब्रीज, आढळगांव ता. श्रीगोंदा येथे रेल्वे ओव्हरब्रीज आदी महत्वाच्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. पैठण-मोहरी-खर्डा या ५५ कि. मी. लांबीच्या पालखी मार्गाचे काम वारकऱ्यांसह शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने हे काम गुणवत्तापुर्ण व वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश यावेळी खा. लंके यांनी दिले. 

नियमित आढावा बैठक घेणार 

काही प्रकल्पांमध्ये अडथळे येत असल्यास त्यासंदर्भात केंद्र सरकारकड पाठपुरावा करून ते दुर करण्यात येतील. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्यात येईल. कामे दर्जेदार व वेळेत होण्यासाठी नियमित आढावा बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने