![]() |
संघर्ष मराठी २४ न्यूज / तालुका प्रतिनिधी नाथाभाऊ शिंदे पाटील |
नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा येथे नुकत्याच ८ एप्रिल २०२५ रोजी वक्तृत्व सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नेवासा येथील समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले व सरपंच महेश शरद पाटील शिंदे एडवोकेट बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते यावेळी१) छोटा गट वक्तृत्व स्पर्धा २) मध्यम मोठा गट वक्तृत्व स्पर्धा ३)वैयक्तिक नृत्य स्पर्धा ४) एक पात्री नाटिका समूह नृत्य व गायन हे कार्यक्रम ८ एप्रिल पासून ते ११ एप्रिल पर्यंत रोज संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत पार पाडण्यात आले मुला-मुलींमध्ये कला व नेतृत्व गुण प्रकट व्हावे, त्यांना भावी आयुष्यामध्ये या कलेचा व वक्तृत्वाचा प्रेरणादायी लाभ व्हावा याकरिता हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमा साठी गावातील माजी सरपंच- डॉ. शंकरराव शिंदे,रवींद्र पाटीलबा भालेराव,श्री. गणेश नरसिंग शिंदे श्री. अंकुश ज्ञानदेव शिंदे श्री. बाळकृष्ण लक्ष्मण शिंदे श्री.बाबासाहेब शेषराव शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वक्तृत्व स्पर्धा करिता परीक्षक -
मा. श्री. निखिल पवार सर
नृत्य स्पर्धा करिता परीक्षक
संपदा ससे मॅडम ( लोकमत सखी मंच) , तेजस्विनी कदम मॅडम ( नृत्य शिक्षिका ) अनिता कोतकर मॅडम
वक्तृत्व व सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे
छोटा गट वक्तृत्व -
प्रथम - श्रावणी संदीप तनपुरे ( भालगाव)
मध्यम गट वक्तृत्व -
प्रथम - साक्षी सुनील गारुळे ( बेलपांढरी )
मोठा गट वक्तृत्व -
योगिता सोमनाथ शिंदे
विजेते नृत्य स्पर्धा -
छोटा गट नृत्य स्पर्धा
प्रथम - कुमारी प्रांजल युवराज थोरात
मध्यम गट नृत्य -
प्रथम - भक्ती गणेश धुमाळ
मोठा गट नृत्य -
प्रथम - श्रेयसी रविंद्र भालेराव
समूह नृत्य विजेते
छोटा गट समूहनृत्य
प्रथम - अंकित ग्रुप
मध्यम गट समूहनृत्य
प्रथम - आंबा ग्रुप
मोठा गट समूहनृत्य
प्रथम - शिवकन्या ग्रुप.
नाटिका स्पर्धा
छोटा गट
प्रथम - अंकित अंकुश शिंदे
मध्यम गट
प्रथम - भक्ती शिवाजी जायगुडे
मोठा गट -श्रावण अंकुश शिंदे
दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी यावेळी क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ही कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजिनीयर श्री भास्कर आबासाहेब शिंदे ,श्री नाथाभाऊ शिंदे पत्रकार , गणेश नरसिंग शिंदे ,अंकुश ज्ञानदेव शिंदे, बाळकृष्ण शिंदे ,रवींद्र भालेराव इत्यादी उपस्थित होते तसेच भालगाव उस्थळ खालसा साईनाथ नगर बोरगाव बेलपिंपळगाव बेलपांढरी या पंचक्रोशी गावातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्याचप्रमाणे पंचकोशीतील नागरिक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री गजभिये सर यांनी निवेदन व सूत्रसंचालन केले.
