काटाळवेढे येथे तमाशा कार्यक्रमातील विनोदातून उमाजी नाईकांचा अपमान ; सौ. नंदारानी भोकटे यांनी मागितली माफी


प्रतिनिधी – दि. ६ एप्रिल २०२५ रोजी एका तमाशा कार्यक्रमादरम्यान राजे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा अपमान झाल्याच्या प्रकरणी जय मल्हार क्रांती संघटनेने तीव्र  प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नारायणगाव ता, जुन्नर (जि. पुणे) येथील नंदारानी पुणेकर तमाशा मंडळावर जय मल्हार क्रांति व अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिरतर  यांच्याकडून माफीनामा देण्याची विनंती करण्यात आली आहे.

तमाशा कलाकारांच्या विनोदांमुळे उमाजी नाईक यांचा अपमान झाला आहे .

जागेची माहिती अशी की, काटाळवेढे येथील तमाशा कार्यक्रमात कलाकारांनी विनोद करताना राजे उमाजी नाईक यांच्या नावाचा उल्लेख दरोडेखोर असा केला. त्यामुळे त्यांच्या सन्मानाला, तसेच संपूर्ण रामोशी समाजाच्या भावनांना गंभीरपणे दुखापत झाली आहे. जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने म्हटले आहे की, या चुकीच्या संदर्भामुळे समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये आणि उद्रेक टाळण्यासाठी त्वरित माफीनामा द्यावा.

 रामोशी समाजाच्या भावना दुखावल्या

संघटनेने स्पष्ट केले आहे की, उमाजी नाईक हे आद्य क्रांतिवीर असून त्यांचा अपमान करणारा उल्लेख सहन केला जाणार नाही. यामुळे रामोशी समाजाच्या सन्मानाचा तडा बसलेला आहे. या प्रसंगाला गंभीरतेने पाहून पुढील काळात अशा प्रकारच्या गैरप्रचारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले आहे.

जय मल्हार क्रांती संघटनेने गरज भासल्यास पुढील कायदेशीर व सामाजिक पातळीवरही आवश्यक ती पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.

सौ.राणीताई भोकटे यांनी कलाकारांच्या वतीने माफी मागितली

सौ.नंदाराणी भोकटे यांनी पत्रात म्हटले आहे की,मी आपली जाहीर माफी मागते सदर माझ्या कलावंताकडून बोलण्याच्या ओघात आपली मने दुखावली असतील त्या बद्दल मी पुन्हा अशी चूक होऊन देणार नाही तरी आपण मोठ्या मनाने मला माझ्या कलावंताना माफ कराल अशी विनंती करते.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने